about us.. organization.. anual report.. loan schemes.. deposit schemes.. circulars.. important links.. feedback.. news & events.. font problem?.. public information officers.. self help group..

 


 

दि अहमदनगर डिस्ट्रिक्ट सेन्ट्रल को ऑपरेटिव्ह बँक लि.

परिपत्रक

सर्व शाखाधिकारी,

                    विषय : ग्राहक ओळख मार्गदर्शक तत्वे, काळापैसा शोध मोहिमेची तत्वे
                            (कमी उत्पन्न गटाचे खाते उघडणेबाबतीत नियमांचे शिथलीकरण)
        संदर्भ रिझर्व्ह बँक पत्र क्रं. आर. पी.सी.डी/ आरएफ/ अ॓ एमएल/ बीसी/ नं.३२/०७.४०.००/ २००५.०६ दिनांक २३.८.२००५
रिझर्व बँकेने कमी उत्पन्न गटातील ग्राहकांचे खाते उघडुन घेतांना कागदपत्रांचे पुर्ततेसंबंधी नियम शिथिल करणेबाबत संदर्भिय पत्रान्वये जिल्हा बँकांना कळविले आहे.

                           KYC तत्व प्रणाली अंतर्गत ग्राहकांची खाती उघडुन घेतांना ग्राहकांकडुन कोणती कागदपत्रे घ्यावीत. परिपत्रक जा.क्र. डिवायएम/ बँकींग/ १५/ ५७६३ दिनांक २३.९.२००५ सोबत अॅनेक्चर २ मध्ये नमुद बरहुकूम खाती उघडणेबाबत सुचना दिलेल्या आहेत. अॅनेक्चर २ मध्ये नमुद केल्याप्रमाणे दुर्बल घटक / कमी उत्पन्न गटातील व्यक्ती कागद पत्रांची पूर्तता करणेस असमर्थ असल्यास या संबंधीत व्यक्तीकडून  खालील अटीची पूर्तता करुन घ्यावयाची आहे..

                            अ) बँकेच्या ग्राहकांचे नविन ग्राहकाला KYC पध्दतीनुसार ओळख द्यावयाची आहे.. ओळख देणा-या ग्राहकाचे खाते समाधानकारक आणि सहा महिन्यापुर्वी उघडलेले असणे आवश्यक आहे. संबंधित नविन खाते उघडणा-या व्यक्तीचा/ग्राहकाचा फोटो आणि पत्ता ओळख देणा-या ग्राहकांकडुन प्रमाणित करावयाचा आहे.

                         ब) ग्राहकाची ओळख आणि पत्त्यासंबंधी खात्री होईल येथे पावेतो कागदपत्रांची पुर्तता करुन घ्यावयाची आहे.

                    इतर सर्व ग्राहकांची/ ठेवीदारांची ठेव खाती उघडुन घेतांना परिपत्रक क्र. डिवायएम/ बँकींग/१५/५७६३ दिनांक २३.९.२००५ अन्वये दिलेल्या सूचनाप्रमाणेच कार्यवाही करावयाची आहे. KYC अंतर्गत दिलेल्या सूचनाप्रमाणेच ठेव खाती उघडली जातील इकडे सर्व शाखाधिकारी यांनी कटाक्षाने लक्ष द्यावयाचे आहे. याची सक्त नोंद घ्यावी.

                                                                                                         कार्यकारी संचालक

प्रत माहितीसाठी.......

१.       सर्व जनरल मॅनेजर्स, मुख्य कार्यालय, अहमदनगर.

२.      सर्व मॅनेजर्स, मुख्य कार्यालय, अहमदनगर.

३.      सर्व डेप्युटी मॅनेजर्स, मुख्य कार्यालय, अहमदनगर.

४.      सर्व तालुका विकास अधिकारी

५.      सर्व अंतर्गत तपासणी अधिकारी