about us.. organization.. anual report.. loan schemes.. deposit schemes.. circulars.. important links.. feedback.. news & events.. font problem?.. public information officers.. self help group..

 


 

दि अहमदनगर डिस्ट्रिक्ट सेन्ट्रल को ऑपरेटिव्ह बँक लि.

।।परिपत्रक।।

सर्व शाखाधिकारी

                    विषय: आपल्या ग्राहकांना ओळख (KYC) मार्गदर्शक सूचना, प्रणाली आणि काळापैसा शोधण्यासाठी मार्गदर्शक तत्वे,  काळा पैसा मुख्य प्रवाहात येण्यापूर्वी उपाययोजना

                         आपल्या ग्राहकांना ओळख यासंबंधी नाबार्डचे मार्गदर्शक सुचनेनुसार ग्राहकांची खाती उघडुन घेतांना/ खात्यावर व्यवहार करतांना/ इतर बँकींग व्यवसाय करतांना कोणती काळजी घ्यावी. याबाबत तुम्हास परिपत्रक क्र. डिवायएम/ बँकींग/ २२/ ४०४१ दिनांक १४.८.२००४ रोजीचे परिपत्रकान्वये तसेच ग्राहकांची ठेव खाती उघडुन घेतांना ठेवीदाराची अतिरिक्त माहिती घेणेबाबत तुम्हास परिपत्रक क्र. डिवायएम/ बँकींग/ २६/४३६७ दिनांक १९.८.२००४ रोजीते परिपत्रकान्वये सुचना दिलेल्या आहेत.

                        भारतीय रिझर्व्ह बँकेने परिपत्रक क्र. आरपीसीडी/ एएमएल/ बीसी/ नं. ८० / ०७.४०.००/ २००४ / २००५ दि१८.२.२००५ रोजी सर्व जिल्हा बँकांना परिपत्रक पाठवून आपल्या ग्राहकांना ओळखा (KYC) मार्गदर्शक सुचना आणि काळा पैसा शोधुन काढण्यासाठी योग्य ते प्रयत्न करणेबाबत कळविले आहे. रक्कम रुपये ५०,०००/- व त्यावरील रकमेचे डिमांड ड्राफ्ट, मेल / टेलीग्रॅाफीक ट्रान्स्फर, इतर प्रकारचे प्रवासी चेक्स हे संबंधितांचे खात्यात जमा करावेत. रोखीने अदा करु नयेत. या मागील सुचना कायम आहेत. बँकींग रेग्युलेशन अॅक्ट १९४९ सेक्शन ३५ अ॓ नुसार योग्य ती कार्यवाही न केल्यास दंडात्मक कारवाई करण्यात येईल असे परिपत्रकात नमुद केले आहे. परिपत्रकात नमुद केलेल्या मार्गदर्शक सुचना खालील प्रमाणे आहेत.

१) आपला ग्राहक ओळखा काही मापदंड (Know your customer(KYC)Standards): गुन्हेगारी जगतातील लोकांकडुन हेतु परस्पर किंवा निर्हेतुकपणे काळा पैसा मुख्य प्रवाहात (चलनात) आणण्याकामी बँकांचा उपयोग केला जातो. अशा प्रकारची खाती उघडली जाणार नाहीत. त्यासाठी KYC पॉलिसी अंतर्गत खालील ४ पध्दतीचा अवलंब करण्यात यावा

          अ)ग्राहक स्विकारणे पध्दती(प्रणाली)

          ब) ग्राहक ओळखण्याकामी अवलंबिलेली कार्यपध्दती

               मुख्य कार्यालय परिपत्रक क्र. डिवायएम/ बँकींग २२/ ४०४१ दि. १४.८.२००४ व परिपत्रक क्र. डिवाएम/ बँकींग/२६/४३६७  दिनांक १९.८.२००४ अन्वये दिलेल्या सुचनाप्रमाणे.

          क) देवाण घेवाणीवर नियंत्रण ठेवणे..

          क)जोखमीचे व्यवस्थापन शाखाधिकारी यांनी शाखेत होणारे सर्व व्यवहार नजर ठेवणे आवश्यक आहे. KYC हेतु प्रणालीमध्ये ग्राहकांची व्याख्या पुढील प्रमाणे ४ पध्दतीमध्ये केलेली आहे.

          (अ) व्यक्ती किंवा संस्था की जी बँकेत खाते चालविते आणि बँकेशी व्यावसायीक संबंध ठेवते.

          (ब) व्यक्ती की, जिच्या वतीने बँकेतील खाते चालविले जाते (म्हणजे कायदेशीर मालक(ग्राहक))

          (क) ग्राहकाच्या देवाण घेवाणीचे व्यवहार करण्यासाठी कायद्याने परवानगी असलेले लेखा परिक्षक, शेअर दलाल, सॉलीसीटर इ.

          (ड)एखादी व्यक्ती किंवा संस्था की जिचा आर्थिक संबंधि किंवा रेप्युटेशन (प्रसिध्दी) बँकेच्या कामकाजाशी आहे. थोडक्यात अंतरण किंवा मोठया रकमेची देवाण घेवाण असलेले ग्राहक

२) ग्राहक स्विकारणे प्रणाली :- Customer Acceptance Policy (CAP)

          बँकेतील ग्राहक/ ठेवीदार कसा असावा. बँक आणि ग्राहक यांचे संबंध कसे असावेत. याबाबत खालील प्रणालीचा अवलंब करण्यात यावा.

          अ)बेनामी खाते उघडता कामा नये किंवा अज्ञात व्यक्तीच्या काल्पनिक नावाने खाते उघडण्यात येऊ नये.

          ब) जोखीम विषयक मापदंडात खालील प्रकारच्या व्याख्यांचा अंतर्भाव असला पाहिजेय.

                   उदा. धंद्याचे स्वरुप, ग्राहकांचे धंद्याचे ठिकाण आणि त्याचे ग्राहक अदागीचे स्वरुप, देवाण घेवाणीचे प्रमाण, सामाजिक व आर्थिक स्थान इ. ग्राहकांचे वर्गीकरण करतांना कमी, मध्यम आणि उच्च जोखीम अशा प्रकारे किंवा त्यांची जोखीम नामोनिर्देश करतांना पातळी १, पातळी २, पातळी ३, यामध्ये करावी. राजकीय दृष्टया अतिमहत्व असणा-या व्यक्ती की, ज्यांची व्याख्या अनेक्स १ मध्ये आहे. यांचे वर्गीकरण अति उच्च पातळीमध्ये करावे.

          क)ग्राहक/ठेवीदार यांचेकडुन लेखी कागदपत्रे आणि इतर अतिरिक्त माहिती वेळोवेळी तूम्हास कळविल्याप्रमाणे मार्गदर्शक सुचनेनुसार गोळा करावी.

          ड) एखादे खातेदार/ग्राहकाचे खात्याविषयी त्याचे ओळखीविषयी बँकेला कागदपत्रे मिळत नसतील किंवा त्याची ओळख पटत नसेल अशा ग्राहकाचे खाते उघडु नये. तसेच खाते असलेल्या खातेदाराच्या असमंजंस भुमिकेतुन त्याचे खाते बंद करु नये. थोडक्यात त्याची छळवणुक करु नये. खाते बंद करण्याविषयीचा निर्णय खातेदाराला कारणे व पुर्वसुचना देवुन, मुख्य कार्यालयाचे निदर्शनास आणुन पुढील कार्यवाही करावी.

          इ) सध्याप्रचलीत असणा-या कायद्यानुसार आणि बँकींगच्या नियमानुसार मुखत्यार पत्राविषयी  (Power of Attorney) च्या तंतोतंत सुचनांचे पालन करावे. मात्र अशा खात्यासंबंधी प्रथम मुख्य कार्यालयाची परवानगी घ्यावयाची आहे.

          ई) खाते उघडण्यापुर्वी त्या व्यक्तीची पार्श्वभुमी गुन्हेगारी स्वरुपाची किंवा गुन्हेगारी संघटनेशी (बंदी घातलेली संघटना) संबंध आहे किंवा काय याची शहानिशा करण्यात यावी. प्रत्येक ग्राहकाचा प्रथम दर्शनी दिसणारा चेहरा फाईलच्या रुपाने तयार करण्यात यावा. त्यामध्ये खालील माहितीचा अंतर्भाव असावा.

          (i) ग्राहकाची ओळख सामाजीक / आर्थिक स्थान (ii)धंद्याचे स्वरुप  (iii) त्याचे ग्राहकांची माहिती  (iv)धंद्याचे ठिकाण इ. वरील माहिती घेतांना शाखेने ग्राहकाच्या धंद्याशी निगडीत अशी माहिती तयार करावी/गोळा करावी. अनाहुतपणे आलेली/मिळालेली माहिती घेवु नये. ग्राहकाची गोळा केलेली माहिती खाजगी कागदपत्राखाली मोडणारी असेल ती कुठल्याही प्रकारे दुस-यास देण्यात येवू नये.

          ज्या व्यक्ती/ संस्थांचे सांपत्तीक स्थितीची माहिती सहजासहजी मिळेल. अशा व्यक्ती/ संस्थांना कमी जोखमीखाली वर्गीकृत करता येईल उदा. पगारदार नोकर की, ज्यांचे पगार निश्चित ठरलेले असतात. कमी उत्पन्न असलेल्या सामाजीक स्थरातील व्यक्ती की, ज्यांचे खाते कमी उलाढाल दाखवितात. अशा ग्राहकांची ओळख आणि ते करीत असलेल्या धंद्याचा परिसर जाणुन घेण्यात यावा. जे ग्राहक हायरिस्क कॅटॅगरीमध्ये वर्गीकृत केले जातात. त्यामध्ये ग्राहकाची पार्श्वभुमी, धंद्याचे स्वरुप, जागा, देशाचे मुळ नागरीकत्व, उत्पन्नाचे साधन आणि त्यांचे ग्राहकाची इ. वरुन ग्राहक जोखीम स्तर शाखेने ठरवावयाचा आहे. अति उच्च जोखीम स्तर असलेल्या ग्राहकामध्ये खालील ग्राहक अंतर्भुत होतात. (i) अनिवाशी ग्राहक (ii) उच्च प्रतीची सांपत्तीक स्थिती असणा-या व्यक्ती (iii) ट्रस्ट, चॅरिटिज NGO's (Non Government Organisation) आणि देणगी मिळविणा-या संस्था (iv) ׮֟Ե ߟ߻ ߤָ ã, ׮ߵ ߤָ ֻ껵 ã (v) दुस-या देशाचे मुळ असणारे व येथील राजकीय क्षेत्रात पुढे आलेले व्यक्तीमत्व (vi) सर्व साधारणपणे जनतेतुन मिळालेल्या माहितीनुसार ज्यांचे व्यक्तीमत्व खराब आहे अशा व्यक्ती इ.

          ग्राहक स्विकार पॉलिशी कार्यान्वीत करतांना एकदम ग्राहकांना रोखुन धरता कामा नये. की ज्यामुळे सामान्य जनतेचा बँकींग व्यवहार नाकारला जाणार नाही. याची दक्षता घ्यावी.

3) ग्राहक ओळख प्रणाली (पध्दती) (Customer Indentification Procedure (CIP))

         बँकेने संमत केलेली ग्राहक ओळख प्रणाली विविध पातळ्यावर अंमलात आणली गेली पाहिजे. शाखेत खाते उघडतांना आर्थिक देवाण घेवाण करतांना किंवा ग्राहकाच्या प्रामाणिकपणाबद्दल जेथे जेथे शंका असेल तेथे तेथे ग्राहक ओळख प्रणाली अवलंबावी ग्राहकाबद्दल खात्रीपुर्वक माहिती गोळा करावी. नविन ग्राहक, क्वचीत किंवा दररोज येणारा ग्राहक आणि तो करीत असलेला बँकींग व्यवहार इ. संबंधी ग्राहक ओळख करुन घेणे आवश्यक आहे.

          वैयक्तिक, संस्था इ. निसंगत, ग्राहकांचे ओळखीसंबंधी पुरेपुर माहिती मिळविली पाहिजे. त्याचा पत्ता, स्थान आणि त्याचे नजिकच्या काळातील फोटो.

          (i) कायदेशिर ग्राहकासाठी कायदेशिर संबंध प्रस्थापीत करणारे कागदपत्र

(ii) कायदेशिर संबंध दाखविणारा ग्राहक तो कायदेशीर ग्राहक आहे हे ओळखणे

(iii) त्यांचा मालकी हक्क समजावुन घेणे. कायदेशीर ग्राहकांच्या ओळखीसंबंधी अनेक्स १ मध्ये विस्तृत माहिती दिली आहे.

याबाबत अनक्श २ मधील माहिती पहावी.

४) देवघेवीवर देखरेख (Monitoring of Transactions)

         चालु असलेल्या देवघेवीवर देखरेख ठेवणे हा KYC पध्दतीचा मुळ घटक आहे. ग्राहकाच्या दररोजच्या व्यवहारासंबंधी माहिती घेणे. कोणता व्यवहार दररोजच्या देवघेवीपेक्षा जास्त आहे. त्याचे कारण शोधण्यात यावे. अनियमित किंवा अतिमोठे देवघेवीचे व्यवहार करणा-या खातेदारासंबंधी विशेष काळजी घेण्यात यावी. काही खातेदार अमर्यादित रोख भरणा करीत असतील त्यांचे धंद्याचे स्वरुप व ते करीत असलेल्या व्यवहारीवर विशेष लक्ष ठेवण्यात यावे. असे अतिजबाबदारीचे खाते दररोज तपासण्यात यावे. त्यामध्ये काही गैरव्यवहार होत नसल्याची खात्री करुन घ्यावी.

          उदा. ग्राहकाची पार्श्वभुमी, ग्राहकाचा देश, त्याचे उत्पन्नाचे साधन, देवघेवीचा प्रकार (पध्दती) इ. सर्व बाबी विचारात घेता तो करीत असलेले सर्व व्यवहारावर नजर ठेवावी.

          रक्कम रु ५/- लाख व त्यावरील सर्व देवघेवीचे (जमा- नांवे) व्यवहाराचे रेकॉर्ड ठेवण्यात यावे. शाखेत रक्कम रु ५/- लाख व त्यावरील रकमेचे जमा नावेचे व्यवहार नोंदविण्यासाठी रजिस्टर ठेवावे. सदर रजिस्टरमध्ये तारीख, वार अशा व्यवहाराच्या नोंदी व्यवहाराचे संपुर्ण तपशिलासह करण्यात याव्यात.

          रक्कम रु ५/- लाख व त्यावरील व्यवहाराचे स्टेटमेंट दरमहाचे तयार करुन पुढील महिन्याचे ५ तारखेपर्यन्त मुख्य कार्यालयास पाठविण्यात यावे. (सहकारी संस्था व नागरी बँकांचे व्यवहार सोडून)

 

५) जबाबदारीचे व्यवस्थापन :- (Risk Management)

         अंतर्गत शाखांनी उघडलेली ग्राहकांची खाती ही बरोबर आहेत किंवा कसे ? यांची अंतर्गत तपासणी अधिकारी मुख्य कार्यालयाचे अधिकारी यांनी शाखा तपासणीचे वेळी खात्री करुन घ्यावयाची आहे. काही तुटी आढळल्यास त्याची एकत्रित माहिती तयार करुन आडीट कमिटीच्या पुढे प्रत्येक तिमाहीस ठेवावयाची आहे. शाखेतील प्रत्येक खातेKYC     अंतर्गत दिलेल्या मार्गदर्शक सुचनेनुसारच उघडले असल्याची तपासणी अधिकारी यांनी खात्री करुन घ्यावयाची आहे.

६)ग्राहक शिक्षण : (Customer Education)

          ग्राहकाचे नविन खाते उघडुन घेतांना / जुन्या खात्यावर देवघेवीचे व्यवहार होत असतांना आतापर्यन्त वैयक्तिकरित्या कुठलीही माहिती मागविली गेली नाही अशी माहिती ग्राहकाकडुन घेवुन एकत्रित करुन ठेवावयाची आहे.

          उदा. XYZ खातेदार शाखेत खाते उघडण्यासाठी आला आहे. तेव्हा त्याचेकडुन त्याची अतिरिक्त सहजासहजी त्याचेकडुन माहिती घेता आली पाहिजे. १) त्याचा व्यवसाय, २) व्यवसायाचे ठिकाण ३) धंद्याचा मालक ४) त्याठिकाणी असणारा एकुण नोकरवर्ग ५) त्याचेकडे असणा-या गाडया ६) त्याचे नातेसंबंध ७) त्यास असणारी अपत्ये ८) मुले सज्ञान असल्यास करीत असलेले व्यवसाय ९) पॅन नंबर इ. अनेक प्रकारची ग्राहकाकडुन माहिती सहजासहजी घेता आली पाहिजे की, जेणेकरुन त्याचा संपुर्ण परिसर बँकेस परिचीत होईल.

7) बँकेत असणा-या ग्राहकांसाठी KYC प्रणाली(KYC for the Existing Accounts)

          सद्यपरिस्थितीत शाखेत असणारे सर्व ग्राहक/ ठेवीदार यांची खाती, व यापुढे उघडली जाणारी सर्व खाती KYC प्रणाली अंतर्गत असतील याची खात्री करुन घ्यावी. संशयास्पद असलेल्या खातेदाराविषयी नियमित देखरेख ठेवण्यात यावी. काही अनियमितपणा जर आढळला तर त्याविषयी Customer Due Diligence (CDD) मध्ये नोंद करुन ठेवावी. . शाखेतील ग्राहकाचे/ ठेवीदाराचे असहकारितेमुळे (आडमुठेपणामुळे) KYC प्रणाली लागु करता आली नाही. खात्यांसंबंधी काही तुटी राहिल्यास असे खाते बंद करण्याचा अधिकार बँकेस आहे. परंतु असे खाते बंद करण्यापूर्वी खातेदारास पूर्व सुचना म्हणुन नोटीस देण्यात यावी. नोटीस देवुनही खातेदाराने त्याचे खाते नियमित न केल्यास मुख्य कार्यालयाचे पुर्व परवानगीने खाते बंद करण्यात यावे.

          वरील सुचनांची नोंद घेवुन शाखेत असलेली सर्व प्रकारजी ठेव खाती व यापुढे नव्याने उघडली जाणारी ठेव खाती KYC  प्रणाली अंतर्गतच असतील. कोणत्याही प्रकारच्या तुटी राहणार नाहीत याची सर्व शाखाधिकारी यांनी नोंद घ्यावयाची आहे. सदर परिपत्रक शाखेतील सर्व सेवकांना वाचावयास द्यावे व ते वाचल्याबाबत शाखेतील सर्व सेवकांच्या सह्या घ्याव्यात.

                                                                            

कार्यकारी संचालक

         सोबत अनेक्श १ व अनेक्श२

प्रत :-

१. सर्व सरव्यवस्थापक, मुख्य कार्यालय, अहमदनगर.

२. सर्व व्यवस्थापक मुख्य कार्यालय, अहमदनगर.

३. सर्व उपव्यवस्थापक, मुख्य कार्यालय, अहमदनगर.

४. सर्व खाते प्रमुख, मुख्य कार्यालय, अहमदनगर.

५. सर्व उपखाते प्रमुख, मुख्य कार्यालय, अहमदनगर.

६. सर्व तालुका विकास अधिकारी.

७. सर्व तालुका अंतर्गत तपासणी अधिकारी.