about us.. organization.. anual report.. loan schemes.. deposit schemes.. circulars.. important links.. feedback.. news & events.. font problem?.. public information officers.. self help group..Savings Bank A/C: 3.50%
Fixed Deposit Rate: 15 days to 45 days - 5% ; 46 days to 90 days - 5.50% ; 91 days to 180 days - 6.00% ; 181 days to less than 1yr. -  6.75% ;  1yr and above  -  7.50%
Cash Certificate - 7% ;  Mini Cash Certificate -  7% ; Recurring Deposit - 7%


 

  ΏΦκŸΦί Ϋϊ•ΦΤ ‘ΦΦκΈόήΦ -†
 

सर्व तालुका विकास अधिकारी, शाखाधिकारी व इन्स्पेक्टर्स, सर्व सेवा सहकारी संस्थांचे चेअरमन व सचिव यांना कळविण्याचे की, अहमदनगर जिल्ह्यांतील शेती तज्ञांच्या दिनांक २१/१०/२००५ च्या सभेतील शिफारशीचा बँकेच्या मा संचालक मंडळ सभा दि. २१/१०/२००५ मध्ये विचार विनिमय होउन तज्ञ कमेटीने सुचविलेल्या कर्जदरास मान्यता देण्यात आली. त्यानुसार सन २००६ – २००७ ते २००८ – २००९ या ३ सालांची जनरल क. म. पत्रकाचे प्रस्ताव तयार करण्यासंबंधी प्राथमिक सेवा सहकारी संस्थांना सुचना देण्यात येत आहेत. त्याची सक्त अंमलबजावणी करावी.

                प्रतिवर्षी जनरल क.म. तयार करण्याऐवजी ३ वर्षातुन एकदा क.म.पत्रक तयार करावे अशा महाराष्ट्र राज्य सहकारी बँक व सहकारी खात्याकडी सुचनेप्रमाणे आता सन २००६ – २००७ तो सन २००८ – २००९ या ३ वर्षे मुदतीकरीता जनरल क.म. पत्रके तयार करावी लागणार आहेत. यावर्षी सन २००६ – २००७ हंगाम व त्यापुढील २ वर्षासाठी कर्ज मर्यादा मंजुर करावयाच्या आहेत. त्यासाठी खाली दिलेल्या सुचनांप्रमाणे कार्यवाही करावी.

१) नवीन क.म.पत्रके तयार करतांना ती वास्तववादी स्वरुपांत केली जावीत. यासाठी सोसायटीच्या सर्व खातेदार सभासदांशी संपर्क साधुन क.म.पत्रकांत त्यांच्या कर्ज मागणीचा अंतर्भाव करावा.

२)नाबर्डच्या कर्ज धोरणानुसार व शासकीय सुचनेनुसार जमीन धारणाचे प्रमाणांत क.म.पत्रके खालीलप्रमाणे ५ भागांत करण्यात यावीत.

भाग पहिला – १ हेक्टर पर्यत शेत जमीन धारण करणारे सभासद (अत्यल्पभुधारक)

भाग दुसरा – १ हेक्टर ते २ हेक्टक पर्यत (अल्पभुधारक)

भाग तिसरा – २ हेक्टर ते ३ हेक्टर पर्यत (मोठे भुधारक)

भाग चौथा – ३ हेक्टर ते ४ हेक्टर पर्यत (मोठे भुधारक)

भाग पाचवा – ४ हेक्टरवरील जमीन धारण करणारे सभासद (मोठे भुधारक)

            क.म.पत्रकात धारण क्षेत्र हेक्टर – आर मध्ये द्यावे व जिरायत/ बागायत क्षेत्राचा स्पष्ट उल्लेख करावा.

३)    जनरल क.म.पत्रक तयार करतांना सर्व सभासदांना किसान क्रेडीट कार्ड अंतर्गत मंजुरीची मागणी करावी. तसेच प्रत्येक भागासाठी (क्षेत्रानुसार पाच भागासाठी) स्वतंत्र कर्ज मागणी करुन त्याप्रमाणे क.म. सोबत सोसायटीचा स्वतंत्र ठराव जोडावा. सदर ठरावात पिकाचा प्रकार, हंगामाचा प्रकार, सभासद संख्या नियोजित पिकाखालील क्षेत्र व कर्ज मागणीची रक्कम इत्यादीचा तपशील देणे आवश्यक आहे..

४) सभासदांच्या जिंदगीपत्रकांतील प्रत्यक्ष नोंद असलेले एकुण क्षेत्र क.म.पत्रकामध्ये दर्शविले असल्याची प्रथम खात्री करुन जिंदगी पत्रकांतील उपलब्ध बागायत क्षेत्रानुसार क.म.पत्रकामधील बागायत पिकांना कर्जाची शिफारस करावी. संबंधित सभासदांचा जिंदगी पत्रकातील अनुक्रम नंबर क.म. पत्रकांत नमुद केलाच पाहिजे. क.म. पत्रकांतील क्षेत्र जिंदगीपत्रकानुसार असावे.

५) क.म.पत्रकासोबत जनरल सभेने पंच कमिटीस कर्ज मर्यादा मागणीचा अधिकार दिल्याबाबतच्या ठरावाची प्रत जोडावी व सर्व विभागाचे चालु तारखेचे ताळेबंद व इतर आर्थिक पत्रके सर्वसाधारण माहितीसह जोडावेत.

६)सभासदाचे चालु वर्षाचे वसुलास पात्र कर्ज व क.म.पत्रक पाठविण्याच्या तारखेपर्यत आलेला वसुल, येणबाकी व थकबाकी यांची अकडेवारी द्यावी.

७) सभासद येणे कर्जाचा तपशिल, त्याची परतफेड तारीख सभासदाच्या नावाखाली नमुद करावी. अल्पमुदत शेतीकर्ज येणे असल्यास पिकवार व हंगामानुसार येणे कर्ज नोंदवावे. त्याचप्रमाणे सदर पिकास सन २००५ – २००६ सालात दिलेली एकुण मंजुरी नमुद करावी.

८) क.मपत्रकात सभासदाने ज्या पिकाकरिता कर्ज मागणी केली आहे. त्यासंबंधी सभासदांचे लेखी मागणीपत्रक सोसायटीने द्यावे व दप्तरी ठेवावे. शक्यतो सर्व सभासदांच्या सह्या क.म.पत्रकामध्ये द्याव्यात.

९) क.म.पत्रकांसोबत सभासदांचे मागणीनुसार कर्ज मागणी केली आहे. असा दाखला संस्थेचे सचिवाने व पंचकमेटीने क.म.पत्रकासोबत जोडावा.

10)                    पुरवणी क.म.पत्रके अपवादात्मक परिस्थितीतच स्विकारले जातील अशी वेळ शक्यतो येणार नाही. यादृष्टीने काळजी घेऊन क.म.पत्रकात सर्व सभासदांचा समावेश करावा व बागायत क्षेत्रांत घेतल्या जाणा-या पिकांकरितां पुरेशा क्षेत्रासाठी दुसोटा पीक गृहीत धरुन क.म.पत्रकांत कर्ज मागणी करावी व संपुर्ण माहितीसह क.म.पत्रके मंजुरीसाठी पाठवावेत.

११)                     जनरल क.म.पत्रके दि.१५. मार्च २००६ पूर्वी हेड ऑफिसला मंजुरीसाठी पाठवावेत. सर्व जनरल क.म.पत्रके दि. ३१ मार्च २००६ पूर्वी हेड ऑफिसकडुन मंजुर केली जातील.

खरीप/रब्बी हंगाम जनरल क.म.पत्रके व ऊस कॅश क्रेडीट क.म.पत्रके वेगवेगळी करावयाची नसुन खरीप, रब्बी व ऊस कर्जाचे एकच क.म.पत्रक तयार करावयाचे आहे. याची खास नोंद घ्यावी.

१२)                     खरीप कर्जाचे कर्ज वितरण दि. १/४/२००६ पासुन व रब्बी हंगामाचे कर्ज वितरण दिनांक १/१०/२००६ पासुन करावयाचे असल्याने शाखाधिकारी/ इन्स्पेक्टर यांनी खरीप/ रब्बी भागातील क.म. तक्ते सदर मुदतीच्या आत मंजुर होतील असे पहावे. सोसायटीकडुन क.म.पत्रके शाखेकडे आल्यानंतर ते ८ दिनसांच्या आत बिनचुक छाननी करुन हेड ऑफिसला तालुका विकास अधिकारी यांच्यामार्फत मंजुरीसाठी पाठवावेत.

१३)                    पिक कर्ज मर्यादा मागणी करतांना क.म.पत्रकांत खालील माहिती असावी.

अ)सभासद सहकारी साखर कारखान्याचा सभासद आहे काय ? असल्यास कोणत्या, कारखान्याचा, तसेच शेअर संख्या व रक्कम किती आहे ती नमुद करावी.

ब) ऊस क.म.पत्रकात संबंधित सभासदांचे गत वर्षाचे प्रत्यक्ष पडलेले टनेज नमुद केले जात नाही ते नमुद करुन गत वर्षातील एकुण सरासरी टनेजप्रमाणे कर्ज शिफारस होईल याची दक्षता घ्यावी.

            सभासदास कर्ज वितरण करतांना त्याचे नावावरील एकुण जिंदगीचे क्षेत्र व प्रत्यक्ष ऊस, फळबागा इ. पैशाच्या पिकाचे क्षेत्र विचारात घेऊन शिलकी क्षेत्रावरच स्केलप्रमाणे खरीप/ रब्बी कर्ज वितरण करावयाचे आहे. याची सर्व संबंधितांनी नोंद घ्यावी.
 

अ.क्र.

पिकाचे नांव

मा.बोर्ड ऑफ डायरेक्टर्स यांनी मंजुर केलेले हेक्टरी कर्जदर सन २००६ – २००७

     

अ)खरीप हंगाम (भुसार पिके)

 

बाजरी (सुधारीत)

६२५०

ज्वारी (सुधारी)

६२५०

ब) खरीप हंगाम (हायब्रिड पिके)

 

बाजरी (संकरीत)

६२५०

ज्वारी (संकरीत)

६२५०

भात (सुधा. पेरीचा)

८७५०

भात(सुधा. लागवडीचा)

८७५०

भात (बासमती)

१४०००

मका

७५००

नाचणी

५०००

सुर्यफुल (बागायत)

७५००

सर्यफुल (जिरायत)

२६२५

१०

सोयाबीन (बागयत)

८७५०

११

सोयाबीन (जिरायत)

--

१२

तीळ

४०००

१३

तुर (बागायत)

८०००

१४

तुर (जिरायत)

३७५०

१५

मुग, उडीद

५०००

१६

चारा(घास)इ.

३१२५

क)खरीप हंगाम (पैशाची पिके)|

 

कपाशी (सर्व जाती) (लक्ष्मी, एच ४ व वरलक्ष्मी)

१२०००

संकरीत कापुस (बागायत)

१२०००

संकरीत कापुस (जिरायत)

१२०००

सुधारीत कापुस

८५००

केळी जुन लागण

३३०००

द्राक्षे निर्यातक्षम द्रांक्ष उत्पादक

१५००००

 

द्राक्षे – इतर सभासद

१०००००

डाळींब

३७५००

फळबाग (मृगबहार - फळेयेणारी)

२००००

भुईमुग (पावसाळी)

१००००

१०

कांदा

२५०००

११

बटाटा (पावसाळी)

२५०००

१२

टोमॅटो (हायब्रिड)

२५०००

१३

शेवंती,

गुलाब

६२५०

१२५००

१४

भाजीपाला

३०००

१५

आले

१७५००

ड) रब्बी हंगाम (भुसार पिके)

 

ज्वारी (सुधारीत)

६२५०

इ) रब्बी हंगाम (हायब्रिड पिके)

 

ज्वारी संकरीत (बागायत)

६२५०

ज्वारी संकरीत (जिरायत)

५०००

गहु बागायती – अ, उ, दे.

१००००

गहु (जिरायत)

५०००

भात (उन्हाळी)

११०००

संकरीत भात

१४०००

करडई, सोयाबीन, तेलबिया

५५००

सुर्यफुल (बागायत)

७५००

सुर्यफल (जिरायत)

२६२५

१०

हराबरा (बागायत)

९०००

११

हराबरा (जिरायत)

५०००

१२

वालवड (राजमा)

६०००

१३

कुलथी (हुलगा)

३०००

ई) रब्बी हंगामा (पैशाची पिके)

 

केळी (ऑक्टो लागण)

३७५००

डाळींब

३७५००

फळबाग (आंबेबहार, फळेयेणारी)

२००००

भुईग (उन्हाळी)

१४०००

वाटाणा

६२५०

हिवाळी बटाटा (हायब्रीड)

२५०००

टोमॅटो (उन्हाळी) हायब्रीड

२५०००

कांदा

२५०००

दुधीभोपळा (उन्हाळी) रब्बी

१७५००

१०

काली (मांडवावरील)

२५०००

११

भाजीपाला

३७५०

१२

तुती रेशीम

९०००

१३

पानमळा

५००००

फ) ऊस :-

 

आडसाली

४००००

पुर्व हंगामी

४००००

सुरु

३५०००

4

खोडवा

३००००

ऊस ६७१० ४/५फुटी(सरी लागण)

३००००

ऊस पिकाचे बाबतीत किमान कर्जदराऐवजी कर्जदर हा संबंधीत साखर कारखान्याच्या कार्यक्षेत्रातील प्रती एकरी सरासरी ऊस उत्पन्नावर (टनेजवर) आधारीत तसेच संबंधित सभासदाने गत हंगामात केलेल्या प्रत्यक्ष उत्पादनाशी (टनेजशी) निगडीत, अपेक्षित सरासरी ऊस उत्पादन (टनेज) विचारात घेवुन निश्चीत करावा. मात्र हा कर्जदर संमत कमाल कर्जदरापेक्षा जादा नाही याची दक्षता घ्यावी.

                Ύवरीलप्रमाणे क.म.पत्रकाचे प्रस्ताव तयार करण्यासाठी हेक्टरी पिकांचे कर्जदर दिले आहेत. त्यानुसार क.म.पत्रके तयार करुन ते मुदतीत मंजुरीसाठी पाठवावेत. यासाठी सेक्रेटरी सभेत क.म.पत्रकांच्या प्रस्तावांचा कार्यक्रम निश्चीत करुन क.म.पत्रकांचे प्रस्ताव वेळेत मिळतील अशी व्यवस्था करावी व शाखाधिकारी यांनी तपासुन तालुका विकास अधिकारी यांच्यामार्फत योग्य त्यासर्व कागदपत्रांसह मंजुरीसाठी हेड ऑफिसला मुदतीत पाठवावेत.

 

२) शेती कर्ज घोरण – ब)  >>
 

३) शेती कर्ज घोरण – क)  >>ϊ