about us.. organization.. anual report.. loan schemes.. deposit schemes.. circulars.. important links.. feedback.. news & events.. font problem?.. public information officers.. self help group..Savings Bank A/C: 3.50%
Fixed Deposit Rate: 15 days to 45 days - 5% ; 46 days to 90 days - 5.50% ; 91 days to 180 days - 6.00% ; 181 days to less than 1yr. -  6.75% ;  1yr and above  -  7.50%
Cash Certificate - 7% ;  Mini Cash Certificate -  7% ; Recurring Deposit - 7%


 

 

  शेती कर्ज घोरण ब)
- प्राथमिक सेवा सहकारी संस्थांनी सभासदांना आकारावयाच्या व्याजदराबाबत.

 संदर्भ :- १) हे. ऑ. परिपत्रक क्र. शेतीकर्ज / सभासद व्याजदर/ ९५ / १०४६ दिनांक १/३/२००२

            २) हे. ऑ. परिपत्रक क्र. शेतीकर्ज/ सभासद व्याजदर / ७४/१००९ दिनांक १८/१२/२००३

     

प्राथमिक वि.का.सेवा सहकारी संस्थाकडील येणेकर्ज व कॅश क्रेडीटस खात्यावर दिनांक १/७/२००५ पासुन सुधारीत व्याजदराने व्याज आकारणी करण्याबाबतच्या सुचना बँकिंग व अकौंटस विभागाने त्यांच्या परिपत्रक क्र. बीकेजी/अकौंटस/६/ ३४७७ दिनांक २२/७/२००५ अन्वये दिलेल्या आहेत.

        प्राथमिक सेवा सहकारी संस्थांनी सुध्दा त्यांच्या कर्जदार सभासदाकडील येणे कर्जावर सुधारीत व्याज दराने व्याजाची आकारणी करण्याबाबत दि. ३१/५/२००५ रोजीच्या मा.संचालक मंडळाच्या सभेत विचार होऊन प्राथमिक सेवा सहकारी संस्थांनी त्यांच्या सभासदांना अल्पमुदत शेती व मुदती कर्जावर दि. १/७/२००५ पासुन खालील प्रमाणे सुधारीत व्याजदर आकारण्याबाबत बँकेने निर्णय घेतला आहे. तरी त्याप्रमाणे कार्यवाही करावी.
 

अ.नं..

कर्जचा प्रकार

दि. १/७/२००५ पासुन आकारावयाचा सुधारीत व्याजदर टक्के

सर्व प्रकारची अल्पमुदत पिक कर्ज रु. २५०००/- पर्यंत

रु. २५००१/- चे पुढे

१०.५०

११.००

स्पोरॅडीक मध्यम मुदत कर्जे

१४.५०

स्किमॅटीक मध्यम मुदत कर्जे

कुक्कुटपासुन एफ.एस,एस / एस.टी.

ए. आर. एफ.एस. दि. मु. उपसा जलसिंचन योजना

दिर्घ मुदत पंपसेट/पाईप लाईन, दिर्घमुदत फळबाग व द्राक्षबागा

१३.००

(सरसकट)

लघुसिंचन

११.००

लघुसिंचनाव्यतिरिक्त रु. २५०००/- पर्यंत

                             रु. २५००१/- चे पुढे

११.५०

१३.००

मध्यम मुदत रुपांतर, फेररुपांतर, पुनर्वसन

११.५०

मध्यम मुदत साखर कारखाना शेअर्स खरेदीसाठी

१५.००

मध्यम मुदत युटिलिटी व्हॅन खरेदी

१५.००

मध्यम मुदत घरगुती गॅस खरेदीसाठी

१३.००

१०

मध्यम मुदत वीज मंडळ थकीत बिलासाठी

१४.५०

११

मध्यम मुदत शौचालय बांधकामासाठी

७.५०

१२

दिर्घमुदत ट्रॅक्टर्स

१४.५०

१३

दिर्घ मुदत शेतकरी घरबांधणीसाठी

१४.००

सुचना  :-
     १)        व्याजदर आकारणीचा कर्जगट अल्पमुदत पीक कर्जासाठी वर्षातील वसुलास पात्र रकमेवर आधारीत आहे वसुलास पात्र रक्कम दि. १ जुलै ते ३० जुन अशीच धरावयाची आहे. मुदती कर्जासाठी व्याजदर आकारणीचा कर्जगट मंजुर केलेल्या कर्ज रकमेवर आधारीत धरावयाचा आहे. मुदती कर्जाचा गट ठरवितांना संबंधीत सभासदास मंजुर केलेल्या सर्व प्रकारच्या मुदती कर्जाचा एकत्रीत विचार करावयाचा आहे.

२)       नाबार्ड योजनेअंतर्गत झालेल्या पुनर्गठणाबाबत ज्या खात्यामधुन या रकमा वर्ग होऊन आलेल्या आहेत. त्या त्या मुळ कर्ज खात्यांचे वेळोवेळी बदलणारे व्याजदर आकारावेत.

३)        ए.आर.एफ.एफ.एस. लघुसिंचन प्रकारामध्ये पाईपलाईन्स(७५,९० व ११० एम.एम.च्या) इले. मोटार्स ३ व ५ एच.पी.च्या ठिबक सिंचन, स्प्रिंकलर व विहीर दुरुस्ती इ. कारणासाठी दिलेल्या मुदती कर्जाचा समावेश आहे..

)     ए.आर.एफ.एफ.एस. लघुसिंचन व्यतिरिक्त प्रकारामध्ये फळबाग व द्रांक्ष मांडव, संकरीत गाई / म्हशी खरेदी, कुक्कुटपालन, शेळीमेढी पालन, एस.जी.एस.वाय. व गोबर गॅस प्लँट इ. कारणासाठी दिलेल्या मुदती कर्जाचा समावेश आहे.

५)       ए.आर.एफ.एफ.एस. सोडुन प्रकारमध्ये ए.आर.एफ.एफ.एस. डेव्हलपमेंट ऑफ एस.सी./एस.टी.स्किमॅटीक उपसा जलसिंचन योजना, स्किमॅटीक इले.मोटार्स व पाईप लाईन्स, फळबागा / द्राक्षमांडव, स्किमॅटीक कुक्कुटपालन इ. कारणासाठी दिलेल्या मुदती कर्जाचा समावेश आहे.

६)        अल्पमुदत कर्जाच्या थकबाकीदार व ग्रामीण कारागीरांना दिलेल्या कंपोझिट लोन्सच्या थकबाकीदार थक तारखेपासुन १.०० टक्का दंडाचे व्याज आकारावे. मुदती कर्जाच्या थकबाकीदार थक तारखेपासुन २.०० टक्के दंडाचे व्याज आकारावे.

७)       वरील सुधारीत व्याजदर दि. १/७/२००५ पासुन लागु आहेत. तसेच पुर्वीचे येणेबाकीवरही सुधारीत व्याजदरानेच आकारणी करावयाची आहे. उपरोक्त नमुद बदललेल्या व्याजदरा व्यतिरिक्त इतर पुर्वीचेच व्याजदर व सुचना कायम आहेत. त्यामध्ये बदल नाहीत

तालुका विकास अधिकारी यांनी त्यांच्या तालुक्यातील सर्व प्राथमिक सेवा सहकारी संस्थांना या परिपत्रकाच्या झेरॉक्स प्रती द्याव्यात व त्याची पोहोच रेकॉर्डला ठेवावी. संस्था पातळीवर सभासदांच्या विविध कर्ज खात्यावर करावयाच्या व्याज आकारणीबाबत संस्थांना पंधरवाडा सभेत मार्गदर्शन करावे व व्याजदर बदलाची माहिती संस्थांच्या सचिवांना द्यावी. बँकेच्या सर्व क्षेत्रीय सेवकांनी संस्था भेटीच्या व तपासणीच्या वेळी व्याज आकारणी बाबतच्या सुचनांचे पालन होते किंवा नाही याची प्रत्यक्ष खातरजमा करावी व त्यांना आढळुन येण-या त्रुटीबाबत संबंधीत सहकारी संस्थांच्या सचिवांना योग्य ते मार्गदर्शन करावे.

 

कार्यकारी संचालक


  2) -  >>
 
3) -   >>